सेंदूरवाफा येथील निवासी असणारे अर्जुन मेश्राम यांची गडकुंभली येथे शेती असून त्यांनी शेतात धानपिक घेतले आहे धान पिकाला पाणी देण्यासाठी किर्लोस्कर कंपनीची मोटार पंप त्यांनी शेतातील विहिरीवर लावली होती.शुक्रवार दि. 5 सप्टेंबरला पहाटे पाच वाजता हा मोटरपंप चोरीला गेला आहे त्यामुळे मेश्राम यांचे दहा हजार रुपये पेक्षाही अधिक रूपयांचे नुकसान झाले आहे अर्जुन मेश्राम यांच्या तक्रारीवरून साकोली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे