बोईसर येथे तासाभरात सहा दुचाकींचे अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. बोईसर- सिडको बायपास रोडवर रस्त्यावरील चिखलामध्ये दुचाकी स्लीप हे अपघात घडले आहेत. तासाभरात सहा दुचाकींचे अपघात घडले असून सुदैवाने यात कोणती जीवितहानी झालेली नाही दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाले आहेत. दुचाकींच्या अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून व्हिडिओ समाज माध्यमांवर वायरल झालाआहे.