जिल्ह्यात लाडक्या श्री गणरायाच्या आगमनाची धूम सुरू झाली आहे. आपल्या बाप्पाला घरी नेण्यासाठी नागरिकांनी दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळ पासून बाजारपेठेत एकच गर्दी केली. गणेशमूर्ती खरेदीसाठी नागरिकांचा उत्साह ओसंडून वाहत असून, लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वत्र बाप्पाच्या स्वागताची लगबग दिसत आहे.लहान ते मोठ्या मूर्ती बाजारपेठ दाखल झाल्या असून गणेशमूर्ती, सजावटीचे साहित्य, फुलं, पुजेचं सामान खरेदी करण्यासाठी भाविकांनी बाजारपेठ गजबजवून टाकली आहे.