आज दिनांक 4 सप्टेंबर दुपारी दोन वाजता छत्रपती संभाजी नगर शहरातील एका खाजगी रुग्णालयामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या वरती उपचार सुरू आहे .या दरम्यान खासदार संदिपान भुमरे यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. ज्या ज्या वेळेस मनोज जरांगे पाटील यांना हॉस्पिटल असेल आंतरवाली येथे असेल त्या त्या वेळेस मी त्यांना भेटायला जातो. या रुग्णालयात मी आतापर्यंत सात ते आठ वेळेस आलो असेल आंतरवालीला देखील आंदोलन असो किंवा नसो मात्र त्यांची माझी कायम भेट होत असते