Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 23, 2025
आज दिनांक 23 ऑगस्ट दुपारी 3 वाजता वाळुज एमआयडीसी परिसरातील वरिष्ठ उद्योजक भगवानदास अहुजा यांच्याकडून तब्बल 45 लाखांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. व्हाट्सअप ॲप वर वॉटर बिल अपडेट ॲप डाऊनलोड करण्याचा मेसेज आला अन्यथा कंपनीचे पाणी कनेक्शन बंद करण्यात येईल अशी धमकी मेसेज द्वारे देण्यात आली. त्यांनी ॲप डाऊनलोड केलं आणि काही वेळानंतर त्यांच्या खात्यातून तब्बल 53 लाख 81 हजार रुपये हे काढून घेण्यात आले त्यानंतर त्यांनी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे येथे तक्रार देण्यात आली आहे