शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विरार येथील पदाधिकाऱ्यांनी वसई विरार शहर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांची भेट घेतली. महानगरपालिका मुख्यालय येथे ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अतिरिक्त आयुक्तांची भेट घेत महानगरपालिका क्षेत्रातील व विररा परिसरातील नागरिकांच्या रस्ते वीजपुरवठा विविध समस्यांबाबत चर्चा केली व नागरिकांच्या प्रश्न व समस्या संदर्भात यावेळी अतिरिक्त आयुक्तांना निवेदन देण्यात आले. शिवसेना ठाकरे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.