फिर्यादी सौरभ मुडे यांच्या तक्रारीनुसार 23 ऑगस्टला सायंकाळी सात वाजताच्या सुमारास फिर्यादी व आरोपी सारंग कचरे हे बैलपोळा पाहून एम एच 29 बीजी 1075 या क्रमांकाच्या दुचाकीने येत असताना आरोपीने दुचाकी भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालवून वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात झाल्याने फिर्यादी व आरोपी दोघेही गंभीर जखमी झाले.या प्रकरणी 24 ऑगस्टला अंदाजे एक वाजताच्या सुमारास घाटंजी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.