हिंगोली येथील एनटीसी परिसरातील आई जगदंबा नवरात्र महोत्सवाचे बासापुजन छत्रपती शिवाजी राजे उद्यान परिसरात मोठया उत्साहात व विधिवत पुजन करुन करण्यात आले. यावेळी भाविक भक्त मोठया संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी राजे उद्यान एनटीसी हिंगोली येथे नवरात्र महोत्सवानिमित्त आई जगदंबा नवरात्र महोत्सव समितीच्या वतीने बासापुजनाचा कार्यक्रम शुक्रवार दि.५ सप्टेंबर रोजी विधिवत पुजा करुन संपन्न झाला. श्री वाजपेयी गुरु यांच्या उपस्थितीत समितीचे पदाधिकारी व भाविक भक्त उपस्थित होते.