सोलापूर जिल्ह्यातील वैराग पोलीस स्टेशनने पूरग्रस्तांसाठी मदत मोहिम राबवत 230 लिटर खाद्यतेल व जीवनावश्यक वस्तू जमा केल्या आहेत. पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रहार संघटना, शिवशक्ती संघ मंडळ तसेच स्थानिक नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. जमा केलेली मदत दोन दिवसांत पूरग्रस्त भागात पोहोचवली जाणार असल्याची माहिती गावडे यांनी १ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास दिली आहे.