मोताळा तालुक्यातील तरोडा येथे २५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता युवासेना जिल्हा उपप्रमुख प्रवीण किसनराव निमकर्डे यांच्या नव्या घराच्या गृहप्रवेश सोहळ्यास आमदार संजय गायकवाड यांनी उपस्थित राहून आशीर्वाद दिले.या प्रसंगी बुलढाणा शहराच्या माजी नगराध्यक्षा सौ. पुजाताई गायकवाड सोबत उपस्थित राहून नवीन वास्तूमध्ये पाद्यपूजन केले आणि भव्य सत्कार सोहळ्यात सहभागी झाले. तरोडा येथे “मा.आमदार संजय गायकवाड नगर” या फलकाचे अनावरण करण्यात आले.