मौजे दिवेआगर श्रीवर्धन येथे क श्रेणी पर्यटन योजना अंतर्गत भरटखोल पुलाजवळील सामाजिक सभागृहास संरक्षण भिंत बांधकामाच्या कामाचे भूमिपूजन आज शुक्रवार दिनांक २९ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २.३० च्या सुमारास महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याहस्ते संपन्न झाले. या उपक्रमामुळे पर्यटनस्थळावरील सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम होईल तसेच ग्रामस्थांना सामाजिक उपक्रमांसाठी सुरक्षित सुसज्ज सुविधा उपलब्ध होतील. या प्रसंगी ग्रामस्थ मंडळी, महिला मंडळ, तरुण मित्र मंडळ, तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते