आज दिनांक 17 मे रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील चौघाजणांची पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती करण्यात आलीय. जालना पोलीस दलातील चार पोलीस अंमलदारांना राज्याच्या पोलीस महानिरीक्षकांनी पदोन्नती देऊन, त्यांच्या नेमणुका केल्या आहेत. त्यानुसार नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षक अनिल नारायणराव सानप यांची जालना येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात नेमणूक करण्यात आली आहे. तर रामेश्वर एकनाथ काकड यांची छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रात नेमणूक करण्यात आली आहे. तसेच रमेश भाऊराव सदावर्ते य