नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे जिल्हा पदाधिकाऱ्यांची मेळावा शहादा येथील जयहिंद प्लाझा सभागृहात प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. दुपारी माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की मराठा आरक्षण संदर्भात हैदराबाद गॅझेटचा सरकारमधील मंत्री विरोध करत असतील तर सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी.