सुंदरमोती नगरात राहणाऱ्या २३ वर्षीय मयुरी गौरव ठोसर या विवाहितेने कौटुंबिक छळ आणि मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना १० सप्टेंबर रोजी उघडकीस आली आहे. अवघ्या चार महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या मयुरीने राहत्या घरात गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नाही, असा पवित्रा घेत नातेवाईकांनी गुरूवारी ११ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रचंड आक्रोश करण्यात आला होता.