मागील साथ दिवसांपासून गणरायाची मोठ्या भक्ती भावाने पूजा करून, आनंदात गणेश उत्सव साजरा केल्यानंतर, आज गणरायाला प्रथे प्रमाणे निरोप दिला आहे, सुख समृद्ध महाराष्ट्र गणरायाने घडवावा, अशी प्रार्थना करत निरोप दिला असल्याचे पालकमंत्री शंभूराजे यांनी सांगितले साताऱ्यातील हुतात्मा स्मारक येथील नगरपालिकेने तयार केलेल्या तळ्यामध्ये आज मंगळवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता पालकमंत्री यांच्या घरातील गणपती विसर्जन करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.