आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील बिरोबा बनात कुमार बसाप्पा साने (वय ४८, रा. बोलवाड, ता. मिरज) यांनी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवार, दि. २६ रोजी सकाळी उघडकीस आली. साने यांनी बिरोबा बनातील झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला. आरेवाडीचे माजी पोलिस पाटील रामचंद्र पाटील यांनी घटनेची माहिती कवठेमहांकाळ पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या घटनेची नोंद आज बुधवारी सकाळी अकरा वाजता करण्यात आली अधिक तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.