*जायकवाडी प्रकल्पात विसर्ग वाढ – गोदावरी नदीकाठच्या जनतेस सतर्कतेचा इशारा* जायकवाडी प्रकल्प पैठण, नाथसागर जलाशयामध्ये आज, दिनांक 28 ऑगस्ट 2025 रोजी, दुपारी 3 ते 4 वाजेच्या दरम्यान विसर्ग वाढवण्यात करण्यात आली. आदेशानुसार, गेट क्र. 10 ते 27 मधील 18 गेटस 2.0 फुट उंचीवरुन 2.5 फुट उंचीपर्यंत उघडून 9,432 क्युसेक अतिरिक्त पाणी विसर्गासाठी सोडण्यात आले. यापूर्वीच गोदावरी नदीपात्रात 37,728 क्युसेक पाणी आहे, त्यात 9,432 क्युसेक वाढ झाल्यामुळे एकूण विसर्ग 47,160 क्युसेक इतका झाला असून विसर्गाच