राहुरी तालुक्यातील मांजरी गावामध्ये आज शुक्रवारी सायंकाळी शेतकऱ्यांनी बैलपोळा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला आहे. मोठ्या प्रमाणात आकर्षक सजवलेल्या बैल जोड्यांची वाजत -गाजत मिरवणूक काढण्यात आली. मानाच्या बैल जोडीला प्रथम मान दिल्यानंतर हि मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते