गुलाबबाई दुल्लभ राजकुळे कन्या विद्यालयाच्या लेझीम पथकाने आपल्या शिस्तबद्ध सादरीकरण आणि जोशपूर्ण हालचालींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. बिरसा मुंडा चौक ते कन्या विद्यालय या मार्गावर रिमझिम पावसातही विद्यार्थिनींनी केलेल्या या अविस्मरणीय सादरीकरणाचे तळोदेकरांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. या पथकाने ढोल ताशांच्या गजरात मुख्य रस्त्यावरून मिरवणूक काढली.