मेहकर तालुक्यातील पारडा येथे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या ३५ वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. ७ सप्टेंबर) सकाळी उघडकीस आली. मृत युवकाचे नाव पंडित कळणू क्षीरसागर (वय ३५) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंडित क्षीरसागर हे आई, पत्नी आणि दोन मुलांसह पारडा येथे वास्तव्यास होते. घरकुल योजनेअंतर्गत त्यांना घरकुल मंजूर झाले होते