गोंदिया जिल्ह्यातील वैनगंगा नदीत अनोळखी मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली दिनांक 3 सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास हा मृतदेह दिसून आला कपड्यांच्या वर्णनावरून वेलतूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मिशिंग नोंदीची पडताळणी करण्यात आली त्यानुसार एक सप्टेंबर पासून बेपत्ता असलेले शैलेश एकनाथ धारगावे यांचा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले नातेवाईकांनी ही मृतदेहाची ओळख पटवली याप्रकरणी वेलतूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे