तालुक्यातील पाथरी पोलीस स्टेशन हद्दीत बुधवारला मंगरमेंढा शेतशिवारात मृतक शेतकरी केवळराम शेरकी (वय ५० वर्ष) यांचे मृतदेहाजवळ शेतात फवारणी करण्याचे कीटकनाशक आढळले असल्याने मर्ग दाखल केले आहे. तर दुसऱ्याच दिवशी गुरुवारला बोरमाळा येथील शेतकरी केशव चौधरी यांनी शेतात झाडाला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्या ने तालुक्यात खळबळ माजली आहे