लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी १२५ वर्षापूर्वी सार्वजनिक गणेश उत्सवाला सुरुवात केली. तरुण पिढीमध्ये देशाविषयी सामाजिक भावना निर्माण व्हावी हा त्याचा मागचा उद्देश होता. हीच भावना तरुण वर्गणी आत्मसात करावी असे मत व्यक्त केले. पुढील महिन्यात गणेश उत्सव, ईद-ए-मिला दुन्नबी आणि समोर येणारे इतर उत्सवांमध्ये शांतता सुव्यवस्थात रहावी या दृष्टीने पवनी पोलिस विभागाच्या वतीने जातीय सलोखा व शंताता सभेचे तालुका स्तरीय आयोजन २५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता करण्यात आले होते.