राहुरी शहरातील करपे इस्टेट येथे आज शनिवारी दुपारच्या दरम्यान शेखर दायमा यांच्या घरात वाॅशींग मशीनचा अचानक स्फोट होऊन घराली आग लागली होती. मात्र स्थानिकांसह अग्निशमन दल वेळेत घटनास्थळी पोहचल्याने मोठा अनर्थ टळला आहे. प्रसंगी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दायमा कुटुंबीयांची भेट घेऊन विचारपूस केली आहे.