धुळे शहरातील स्नेहनगर परिसरात माजी स्थायी समिती सभापती सोनल शिंदे यांचा १६ वर्षीय मुलगा विराज शिंदे याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ११ सप्टेंबर रोजी रात्री उघडकीस आली. दोन दिवसांपूर्वीच त्याचा वाढदिवस साजरा झाला होता. कुटुंबीय बाहेर असताना त्याने टोकाचे पाऊल उचलले. रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी मृत घोषित केले. कारण स्पष्ट नसून शहर पोलिस तपास करत आहेत.