ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सोमवार दिनांक ११ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ४.३० च्या सुमारास प्रसार माध्यमांशी संवाद साधलेला आहे. यावेळी ते म्हणाले की, निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना प्रतिज्ञापत्र देण्यास सांगितले. काल किंवा परवा त्यांनी सांगितले की सर्व हटवलेली नावे देण्याचे त्यांचे कोणतेही बंधन नाही. निवडणूक आयुक्त राष्ट्रपती किंवा सर्वोच्च न्यायालयापेक्षा वर गेले आहेत का त्यांना इतके अधिकार देण्यात आले आहेत का? राहुल गांधी यांनी उपस्थित केलेले मुद्दे गांभीर्याने घेतले पाहिजे