गणेशोत्सवानिमित्त शहरात अनेक हंगामी व्यावसायिक विक्रीसाठी सातारा शहरात येतात, नुकतेच सातारा नगरपालिकेने मोती चौक ते शनिवार चौक या मार्गावर नो हॉकर्स झोन केल्यामुळे, येथील हंगामी व्यवसायिकांना नगरपालिकेने राजवाडा समोर जागा उपलब्ध करून दिली आहे, वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी नगरपालिकेने शहरातील बाजारपेठेत नो हॉकर्स झोन केले आहे, त्यामुळे हंगामी व्यवसायिकांनी बसायचे कुठे असा प्रश्न निर्माण झाला होता, येणाऱ्या गणेशोत्सवा निमित्त मोठ्या प्रमाणात हंगामी व्यावसायिक सातारा दाखल झाले आहे.