28 सप्टेंबरला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार दुचाकी चोरी करणाऱ्या उमरेड येथील आरोपीला गणेशा का युनिट एकच्या पथकाने ताब्यात घेऊन त्याच्याकडून दोन दुचाकी किंमत एक लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटकेतील आरोपीचे नाव तुषार वाघमारे व नितेश धोंगडे असे सांगण्यात आले आहे. आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.