सायबर फसवणुकीचे प्रकरण आणि अमली पदार्थ संबंधित प्रकरण मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमे अंतर्गत विविध ठिकाणी जनजागृती करणारे बॅनर्स लावण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने आज दिनांक 27 ऑगस्ट रोजी दुपारी 4च्या सुमारास मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी देखील जनतेला आवाहन केलं आहे.