8 सप्टेंबरला गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये वाद करत असताना हा वाद निकाली काढण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तीवर आरोपीने चाकूने पोटामध्ये वार करून जखमी करून आरोपी पळून गेले होते. याप्रकरणी यवतमाळ शहर पोलीस शहर आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.तसेच शहर पोलिसांच्या प्रकट विभागाने आरोपींना ताब्यात घेतले. श्रेयश गावंडे असे जखमी युवकाचे नाव असून साहिल व संचित असे ताब्यामध्ये घेतलेल्या आरोपींची नावे आहे.