श्री गुरुदेव सेवा मंडळ श्री क्षेत्र गुरुकंज आश्रम मोझरी येथून सुरू झालेल्या श्री गुरुदेव क्रांतीज्योत यात्रेचे सानगडी येथे गुरुवार दि.28ऑगस्टला दुपारी4 वाजता आगमन झाले गावकऱ्यांनी या यात्रेची मोठ्या उत्साहात स्वागत केले.प्रचार यात्रा प्रमुख तथा भंडारा जिल्हा सर्वाधिकारी सुशील दादा बुरडे,विठ्ठलराव सावरकर,प्रा. अशोक चरडे,राजेंद्र गाडगे,गजानन अजमीरे,विलास मेश्राम मुक्ता हत्तीमारे यांची यावेळी उपस्थिती होती.तुकडोजी महाराजांचा ग्रामस्वच्छतेचा संदेश देण्यासाठी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे