राज्यात प्रथमच राबविण्यात येत असलेल्या पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ, लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर येथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते आज 26 ऑगस्ट रोजी दुपारी 12.30 वाजता संपन्न झाला. या उपक्रमातून पालकमंत्री कार्यालायाचे अधिकारी, कर्मचारी स्वत: नागरिकांच्या दारात जावून त्यांचे प्रश्न जाणून घेऊन ते प्रश्न सोडविण्यात येणार असल्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.