साधारण तीन दिवसांपूर्वी मुंब्रा येथे कचऱ्याच्या ढिगाऱ्यात स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांना असंख्य व्होटर आयडी सापडले होते. या संदर्भात काँग्रेसचे कळवा मुंब्रा तालुका अध्यक्ष वसीम सय्यद यांनी पत्रकार परिषदेतून माहिती दिली होती. मात्र आज दिनांक 29 ऑगस्ट रोजी दुपारी 4 च्या सुमारास वसीम सय्यद आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही सर्व वॉटर आयडी निवडणूक आयोगाकडे सुपूर्द केले आहेत. या संदर्भात सय्यद यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत माहिती दिली आहे.