वसंतराव मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या बायोमिक्स संशोधन आणि निर्मिती केंद्रात प्रयोगशाळेत काम करत असताना अचानक अॅटोक्लेव कुकरचा स्फोट झाला. या घटनेत कंत्राटी दोन महिला कामगार जखमी झाल्या आहेत. ही घटना मंगळवार ९ सप्टेंबर रोजी दुपारी एकच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. शॉर्टसर्कीटमुळे कुकरचा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.