चिखली तालुक्यातील अमडापूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या उदयनगर येथे अमडापूर पोलिसांनी छापा टाकून दि.२८ मे रोजी उदयनगर येथील वॉर्ड क्र.४ मधील एका घरातून ११ किलो २० ग्रॅम गांजा जप्त केला. या गांजाची किंमत दोन लाख २० हजार रूपये इतकी आहे.अमडापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उदयनगर येथील वॉर्ड क्र. ४, इंदिरा नगरमधील आरोपी महेश राजेंद्र महानकार (रा. वॉर्ड क्र.४, इंदिरा नगर, उदय नगर) याच्याकडे गांजा असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली असता, त्यावरून त्यांनीही कारवाई केली.