दुबई येथे झालेल्या आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव करून विजय मिळवला आहे. पाकिस्तान संघाने भारताला 147 धावांचे आव्हान दिलं होतं. भारताने दीडशे रन करून पाकिस्तानला धूळ चारली. टीम इंडियाचा विजयाचा जल्लोष देशभरात पाहायला मिळाला त्या पार्श्वभूमीवर आज दिनांक 29 सप्टेंबर रोजी रात्री 1च्या सुमारास टेंभी नाका येथे देवीच्या मंडपात देखील जल्लोष करण्यात आला. यावेळी खासदार नरेश मस्के देखील उपस्थित होते.