गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...चा जयघोषात आणि ढोल ताशांच्या निनादात एचटूएम मल्टीप्लेक्स च्या गणरायाचे आज दि. 05 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजताच्या दरम्यान श्री बालाजी तलाव येथे विसर्जन करण्यात आले. या मिरवणूकीमध्ये माजी नगराध्यक्ष अशोकभाऊ हेडा यांच्यासह सर्व कर्मचारी व भावीक भक्त सहभागी झाले होते.