रत्नागिरी शहरातील शांतीनगर येथे वडिलांनी आणि स्वतः काढलेल्या तब्बल 1 कोटी कर्जाला तसेच आपल्या बेरोजगारीला कंटाळलेल्या पोटच्या मुलाने आईचा धारदार सूर्याने खून केला. त्यानंतर त्याने आपल्या दोन्ही हातांच्या नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवार 26 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास घडली. ऐन गणेशोत्सवात घडलेल्या या घटनेमुळे रत्नागिरी शहर हादरुन गेले आहे. पूजा शशिकांत तेली (45, रा. शांतीनगर केदारलिंग प्रसन्न बंगला, रत्नागिरी) असे खून करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे