परभणी गंगाखेड महामार्गावर दैठणा परिसरात दोन दुचाकींच्या धडकेत एका 45 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाल्याची घटना रविवार दिनांक 5 ऑक्टोबरला सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. या प्रकरणात 5 ऑक्टोबर च्या सायंकाळी सातच्या सुमारास दैठणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.