कोहळगाव कान्होली येथील रहिवासी लष्करी जवान चैतराम गुणीलाल ताराम हे गेल्या आठ महिन्यांपासून दिल्ली रेल्वे स्टेशन वरून बेपत्ता आहेत आणि अध्याप त्याचा शोध लागलेला नाही मुलगा अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंब चिंतेत आहे बेपत्ता लष्करी सैनिक चैतराम ताराम यांचे वडील गुनीलाल ताराम यांनी माजी राज्यमंत्री आणि आमदार राजकुमार बडोले यांना निवेदन सादर केले आणि बेपत्ता सैनिकाच्या शोधात मदत करण्याची विनंती केली. आमदार राजकुमार बडोले यांनी तात्काळ त्यांच्या घरी जाऊन भेट दिली आणि कुटुंबांची भेट घेतली