काँग्रेस पक्षाच्या वतीने जव्हार येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत काँग्रेस पक्षाचा जव्हार तालुक्यातील सविस्तर आढावा घेण्यात आला. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली व उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले .काँग्रेसचे पालघर जिल्हाध्यक्ष प्रफुल पाटील, किसान काँग्रेसचे पराग पष्टे, बळवंत गावित आदींसह जव्हार तालुक्यातील काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते बैठकीस उपस्थित होते.