गणेश भक्तांनी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहे. दरम्यान, कोणीही पर्यावरणाला बाधा पोहोचेल, असे कृत्य करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. आज गुरुवार दिनांक 28 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सोशल मीडियाद्वारे व्हिडिओ शेअर करत त्यांनी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन केले आहे.