अहेरी पोलिसांनी आलापल्ली येथील वनविभागाच्या खसरा डेपो जवळ केलेल्या कारवाईत ५.७० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये अवैध दारूने भरलेले वाहन सोडून पळून गेलेल्या अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना गुरुवारी, २१ ऑगस्ट रोजी रात्री १०.४० ते ११.५० च्या दरम्यान घडली. पोलीस स्टेशन अहेरी येथील पोलीस उपनिरीक्षक सुनील शांताराम पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, त्यांनी टीमसह कारवाई केली.