29 सप्टेंबरला रात्री 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एमडी तस्करी करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे आरोपीकडून 106 ग्राम एमडी,एक मोबाईल फोन आणि एक दुचाकी असा एकूण सहा लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटकेतील आरोपीचे नाव चेतन महतो असे सांगण्यात आले असून आरोपी विरुद्ध प्रताप नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आरोपीने हे एमडी मुंबई येथून आणले असल्याचे कबूल केले आहे.