परळी तालुक्यातील जळगव्हाण तांडा येथे गुरुवारी रात्री एक गंभीर मारहाणीची घटना घडली आहे. काही गावगुंडांनी एका कुटुंबास विटा, दगड आणि काठ्यांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात दोन महिला आणि एक पुरुष जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू असून, मारहाणीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ गुरुवार दि.21 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.