राजगुरुनगर शहरालगत सातकरस्थळ पश्चिम येथे भंगार व्यवसाय करणा-या २२ वर्षीय युवकाने २ मुलांची आई असणाऱ्या ३५ वर्षीय महिलेने ठेवलेल्या प्रेमसंबधाला कंटाळून टोकाचे पाउल उचलले असल्याची घटना सोमवारी २५ आँगस्ट रोजी समोर आली आहे.मोसिम शब्बीर शेख वय २२ रा, सातकरस्थळ पश्चिम ता. खेड असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.