बिहार येथील निवडणूक डोळ्यासमोर तेथील महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येत आहेत. दरम्यान, हे पैसे महाराष्ट्रातील पुरग्रस्तांसाठी वापरण्यात यावेत, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी केली आहे. आज सोमवार दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सोशल मीडियाद्वारे व्हिडिओ शेअर करत त्यांनी मागणी केली आहे. तर त्यांनी केशव उपाध्ये यांच्यावर जोरदार टीका केली आहे.