दहा सप्टेंबरला सकाळी दहा वाजता बैलवाडा-गुमथळा मार्गावर एका दुर्दैवी घटनेत माकडाला स्टार बसची धडक बसली, ज्यात ते गंभीर जखमी झाले. ही घटना बैलवाडा गावातील रहिवासी मंगेश उचके यांनी पाहिली. माकडाला डोक्याला जबर मार लागला होता आणि त्याला झाडावर चढणेही शक्य नव्हते. त्याच परिसरात मोठ्या प्रमाणात कुत्र्यांचा वावर असल्यामुळे माकडाच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. हे लक्षात येताच मंगेश उचके यांनी तात्काळ गुड्डू शेटे, सागर वराडे आणि आकाश भडंग यांच्याशी संपर्क साधला.