यवतमाळ जिल्ह्यातील शासकीय यंत्रणे मधील बेकायदेशीर भरती, पदोन्नती, कर भ्रष्टाचार आणि अन्य गैरप्रकार याबाबत विभागीय आयुक्त, अमरावती यांनी दिनांक ५ जून २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला स्पष्ट आदेश दिले. या आदेशानुसार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करून सखोल तपास सुरू करावा, असे स्पष्टपणे नमूद होते. परंतु तीन महिने उलटले तरी समिती गठीत करण्यात आलेली नाही.