बेलोरा येथील खोराडी नदीला दि. २८ ऑगस्ट रोजी 4 वाजता आलेल्या पुरामध्ये नदीपात्रत बैलजोडी वाहून गेल्याची घटना घडली. सविस्तर असे की, तालुक्यात सकाळपासूनच आभाळात ढग दाटून दिसून येत होते. त्यामुळे पाऊस येणार असे वाटत असतानाच दुपारी ४.३० च्या सुमारास धो धो जोरदार मुसळधार पावसाने हजेरी लावली. सतत एक तास कोसळलेल्या संततधार पावसाने बेलोरा येथील खोराडी नदीला पूर आला. या पुरामध्ये एका शेतकऱ्यांची बैलजोडी वाहून गेल्याची घटना घडली.